Mazi Aai Nibandh in Marathi | माझी आई निबंध मराठी 

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये माझी आई (Mazi Aai Nibandh) या विषयावर निबंध लिहला आहे.(Mazi Aai Nibandh)

आई हि निस्वार्थ प्रेमाची ,अमर्याद बलिदानाची,अटूट शक्तीची प्रतीक असते.या जगात आपल्याला भेटणारी पहिली व्यक्ती म्हणजे आपली आई. आई आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रवासात मार्गदार्शक असते.आईचे आपल्या ह्रिदयात विशेष स्थान असते.

माझ्या आईचे सर्वात उल्लेखनीय गुणांपैकी एक म्हणजे तिचे कुटुंबावरील अतूट प्रेम आणि पाठिंबा. आपल्यावर किती अडथळे किंवा अडचणी आल्या तरी ती एक ऐकण्यासाठी नेहमीच तयार असते तिच्या प्रेमाला सीमा नाही आणि या प्रेमाच्या आमच्या कुटुंबाला खूप गरज आहे. माझ्या आईच्या कामाची नैतिकता खरोखरच प्रेरणादायी आहे. कुटुंबाला काय हवा नको ते सर्व ती बघते. माझ्या आई बद्दल मला सर्वात जास्त आवडतं असलेली एक गोष्ट म्हणजे इतरांचे यश  साजरी करण्याची  तिची क्षमता. कुटुंबातील सदस्य मित्र किंवा सहकारी असो ती नेहमीच तिचे अभिनंदन आणि समर्थन देण्यासाठी तत्पर असते.

मी मोठा झालो असलो तरी तिला माझ्या गरजा माहित आहेत आणि मी एक शब्दही न देता ती समजून घेते मी तुझ्याकडून दयाळूपणा आणि प्रेम शिकलो तिने मला शिकवले की परिस्थिती कितीही वाईट असो फक्त  फक्त प्रेमच आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढू शकता.  माझी आई माझ्यासाठी आधारस्तंभ आहे. माझ्या आईने म्हणत होतो साथ दिली आहे जेव्हा मी संकट असतो किंवा ज्या परिस्थितीत मी अडकलो असो तेव्हा ती नेहमीच माझ्यासाठी असते मला संरक्षण करते आणि मला मार्गदर्शन करते ती माझी आवडती शिक्षिका आहे जिने मला जीवनाबद्दल आणि त्यातील सौंदर्याबद्दल शिकवले आहे. आमच्या कुटुंबाला एकत्र ठेवणारी  एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आई.

आईने मला गरीब श्रीमंती सुंदर करून याचा बेत करायला शिकवले ती म्हणते एखाद्या व्यक्तीचे हृदय  सुंदर  असेल  तर  ही गोष्ट त्याला श्रीमंत बनवते त्याची तात्पुरती संपत्ती  नाही. माझी आई मला सतत विविध गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देते मग ती आयुष्यात असो किंवा अभ्यासासाठी तिने मला अभ्यासासोबतच इतर उपक्रम करायला नेहमीच  प्रेरित केलं. माझी आई एक उत्कृष्ट स्वयंपाकी आणि गृहिणी आहे ती खूप स्वादिष्ट जेवण बनवते.  आपली आई आपल्या आयुष्य घडवते मला तुझा खूप आधार वाटतो आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या कष्ट मेहनत याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे.

देव सगळीकडे येऊ  शकतनाही म्हणून त्याने आईला जगात पाठवले . मोबाईल कॉम्प्युटरच्या जगामध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना महत्व देत नाही खास करून आपल्या आईला आई आपल्या आसपास असते पण आपण कधी एकत्र बसून सोबत बोलत नाही तिच्याबद्दल विचारत नाही.आपण फक्त मदर्स डे ला आईसोबत फोटो काढला आणि स्टेटस ला ठेवला कि झाला मदर्स डे साजरा केला नसत.

  मुलं मोठी होतात आणि आपल्या कामांना लागतात. आपण स्वतःचा कामात इतके व्यस्त होतो कि लहानपणापासून आईने आपल्या साठी केलेली मेहनत आपण विसरून जातो.आई ही एका घराचा पाया असते. आई घराला घरपण आणते. आई घरात नसली तर घर खूप शांत शांत होता . एक व्यक्ती आयुष्यात कितीही मोठा झाला तरी आईसाठी ते तिचा लहान बाळच असत.आईसाठी सर्वात मोठी गोष्ट आपण काही करूशकतो तर ती म्हणजे  तिला दिलेला वेळ.

मुलं आई वडिलांना सांभाळत नाही त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. ती मुलं हे विसरुंन जतात ह्याच आई ने आपल्याला ९ महिने पोटात सांभाळलं लहानाच मोठं केला आणि त्यानाच आपण वृद्धाश्रमात ठेवतो.आई आपल्या साठी खूप काय करते या गोष्टीचा आपल्याला भान असायला हवे . आई घरात सर्वात लवकर उठते . सर्वंनासाठी स्वयंपाक करते.आधी बाकी लोकांना खाऊ घालते मग ती खाते.या सगळया  दिवसभरच्या कामानं मध्ये तिला स्वतः साठी वेळ भेटत नाही.

तिला आपले स्वतःचे छंद जोपयसाचे वेळ ही भेटत नाही.तरीसुद्धा ती कुणाला काही न संगता आप्ले काम करत असते.घरात कोण आजारी पडलं कि आई रात्र भर जागून त्या व्यक्तीची काळजी घेते.मुलांना शाळेला सुट्टी असते,बाबांना ऑफिसला सुट्टी असते पण आई ही अशी व्यक्ती आहे कि ती कधीच सुट्टी घेत नाही.कोणते पण सन समारंभ असले तर आई अजून काम करते ती कधीच सुट्टी घेत नाही.शाळेचा अभ्यास असेल किंवा आयुष्यात कोणतं संकट असेल सर्वात पहिले मदत करणारी ही आईच असते.   

Mazi Aai Nibandh 2

माझ्या आईचे नाव वनिता आहे.ती दररोज सकाळी लवकर उठते.मी आईचे सर्व गोष्टी ऐकतो आणि ती जे सांगेल तेच करतो.माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते.ताई घरातील सर्व सदस्यांची खूप काळजी घेते.घरातील सर्व काम आई करते. ती खूप मेहनत घेते.एवढी मेहनत करून सुद्धा तुझा चेहरा नेहमी हसमुख असतो घरात कोणी आजारी पडले की त्या व्यक्तीची आई खूप काळजी घेते. आई हे कोणत्याही मुलाची पहिली शिक्षक असते .मला चांगले संस्कार हे माझ्या आईमुळे लागले आहेत.

आई मला हाक मारते आणि तिच्या त्या आवाजाने मी दररोज सकाळी लवकर उठतो. मी उठायच्या बराच वेळ आधी तिचा दिवस सुरू झालेला असतो.माझ्यासाठी गरम पाणी शाळेचा डब्बा चहा गरम पोळ्या तयार झालेल्या असतात. मी शाळेत जातो व आई घर कामात गुंते. भावाला उठवणे, बाबांचा नाश्ता व डबा बनवणे अभ्यास घेणे, शाळेच्या कपड्यांची इस्त्री करणे  हे सगळं आवरून देवाच्या पूजेला सुरुवात करते.

दुपारी शाळेतून आल्यावर घाम घाम झाल्यास आधी आंघोळ कर असे म्हणते माझी आई. शाळेच्या गप्पा गोष्टी अगदी आवडीने ऐकते भरभर जेवू नकोस ठसका लागेल असे सतत सांगते. अभ्यास घेता घेता संध्याकाळच्या न्याहारीची तयारी करते. कितीही नाही म्हणलं तरी थोड्या वेळाने स्वतःच्या तासभर खेळायला पाठवते.

आम्ही घरभर मांडलेल्या पसारा कधी चिडून, कधी रागवून, तर कधी हसून सर्व उचलते. दंगा मस्ती करण्यास आईची कधीच मनाई नसते पण तिचे काही नियम तोडल्यास कान उघडणे ही करते आईच्या आमच्यापासून अपेक्षा फार स्पष्ट आहेत अभ्यास करा मोठ्यांचा आदर करा स्वतःचे रहा कुणाची मन दुखवणे करू नका नवीन मित्र मिळाल्यास जुन्या मित्रांना विसरू नका. आजी आजोबा वर वारंवार चौकशी करा व निस्वार्थ भावाने लोकांची मदत करा आई आमच्या छोट्याशा मोठ्या गरजा पुरवण्यासाठी सतत हजर असते मित्रांची कट्टी फु ,अभ्यासातील अडचणी सोडवायला मदत करते. आई या शब्दाचे अक्षर जरी दोनच असले तरी या दोन अक्षरात आखे घर सामावते. 

“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” या उक्तीनुसार खरंच आईविना आपले जीवन हे निरर्थक आहे माझी आई माझे सर्वस्व आहे ती माझी गुरु मार्गदर्शक तसेच खरी मैत्रीण आहे.आई मला चांगले काय वाईट काय हे योग्य पद्धतीने समजावून सांगते.आई मला अभ्यासात योग्य ते मार्गदर्शन करते.काही रात्री झोपताना मला छान छान गोष्टी सांगते.माझी आई मला जेवण कसे जगावे हे शिकवते. गरीब गर्ज लोकांची मदत करण्यासाठी नेहमी प्रेरित करत असते.

माझी आई खूप प्रेमळ कष्टाळू आहे घरातील सर्वांचे काळजी घेते माझी आई घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते माझी आई माझे प्रेरणास्थान आहे मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो कारण देवाने मला एवढी प्रेमळ मायाळू आई दिली आहे माझी आई ही माझ्यासाठी देवाने दिलेली एक अनमोल असे वरदान आहे अशी ही माझी आई मला खूप आवडते. 

आईवर निबंध लिहिताना लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे(Mazi Aai Nibandh)

निबंधाची सुरवात एका छान ओळी ने करा. 

तुमच्या आई सोबतचे आनंदाचे क्षण लिहा-तुम्ही एकत्र आलेल्या आव्हानांचा किंवा तिच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने तुमच्या जीवनात बदल घडवून आणलेल्या प्रसंगांचा समावेश असू शकतो.

तुमच्या आईला खास बनवणाऱ्या गुणांचे आणि वैशिष्ट्यांचे वर्णन करा. यात तिची दयाळूपणा, शहाणपण, विनोदबुद्धी किंवा इतर कोणत्याही वैशिष्ट्यांचा समावेश असू शकतो ज्याची तुम्ही प्रशंसा करता.

तुमच्या आईने तुमच्यासाठी आदर्श म्हणून कसे काम केले याची चर्चा करा. तिने तुमच्यामध्ये जी मूल्ये रुजवली आहेत आणि तिच्या उदाहरणावरून तुम्ही शिकलेल्या धड्यांवर विचार करा.

तुमच्या कल्याणासाठी तुमच्या आईने केलेल्या त्याग आणि कष्टांची कबुली द्या. यामध्ये तिने तुमचे शिक्षण, करिअर किंवा वैयक्तिक विकासासाठी केलेल्या त्यागांचा समावेश असू शकतो.

कठीण काळात तिच्या प्रेमाने आणि प्रोत्साहनाने तुम्हाला उंचावलेले क्षण हायलाइट करा.

तुमच्या आईने तुमची ओळख, आकांक्षा आणि जागतिक दृष्टिकोन ज्या मार्गांनी आकार दिला आहे त्यावर विचार करा. तिच्या प्रभावामुळे तुम्ही आज आहात त्या व्यक्तीला आकार देण्यास कशी मदत केली आहे यावर चर्चा करा.

तुमच्या आईने तुमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमची कृतज्ञता आणि कृतज्ञता व्यक्त करा.

वाचा –

Majhi Shala Nibandh Marathi | माझी शाळा निबंध मराठी


शाळेसाठी लागणारी महत्त्वाची उपकरणे-click here

Scroll to Top